Pach bhakri Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
पांच भाकरी दोन मासे
पांच हजारांना झाले पुरेसे
शास्त्रच सांगते घडले हे कसे
लहान मुलाने शिकले घरात
आशिर्वाद येशूच्या मागे जाण्यात
आईने शिकविले मुलाला घरात
घेण्यापेक्षा धन्यता आहे देण्यात
जर मी म्हणेल माझं माझ्याचसाठी
आशीर्वाद गमवेल नेहमीसाठी
हातात जे आपल्या ते देऊ प्रभूला
आशिर्वाद अनुभवू समर्पणाचा