Prabhu Yeshu Lyrics
- Genre:Gospel
- Year of Release:2023
Lyrics
प्रभु येशु तुझे स्वरूप
माझ्या नेत्रांना सुंदर
शिष्य मला तू कर तुझ्याच
स्वरूपात रूपांतर
पाहूनी तुझे प्रेमरूप
मी करीन प्रिती जन्मभर
जाळुनी माझा मीपणा मला
तुझ्याच प्रीतीने भर
हीन दीनांना धीर देण्यास
आला तू ह्या भूवरी
आनंदाने मलाही
करू दे दया तुझीयापरी
दासा सारखी सेवा केली तू
जरी देवाचा एकुलता
वास करू दे माझ्या मनात
तुझी तीच नम्रता
पातक्यांचा विरोध सहन
केला देवाच्या कोकऱ्या
राग सोडून क्षमा करण्यास
शिकव तूच मला
इच्छा बापाची पूर्ण करण्याची
होती तुला सदा भूक
माझी इच्छाही होऊ दे
प्रभु तुझ्या इच्छेस अनुरुप
बालपणात वचनातून प्रश्न
केले तू प्रभुजी
गुरू खरा तू कर स्पष्ट
ते वचन सदा मलाही
जागलास तू प्रार्थनेसाठी
रात्रभर प्रभुराया
जागे राहून प्रार्थना करण्यास
शिकव तूच मला
द्वेष करीतो ढोंग सोंग तू
आणि सर्व खोटेपणा
वास करू दे माझ्या मनात
बालकाचा सरळपणा
नावलौकिक सर्व भौतिक
नाकारिले तू प्रभुजी
खरे धन हे तूच मानून
जगू दे मला प्रभुजी
निराश्रितांना आश्रय
देतोस तू दीन-दयाळा
सामर्थ्य तुझे दे मला
मी आहे दीन-दुबळा
दुताहून आणि मानवाहून
आहे तू अतिसुंदर
पाहून मी ती दैवी सुंदरता
हर्षित होईल निरंतर