![Yeshu Changala](https://source.boomplaymusic.com/group10/M00/01/07/5f90cd12c4a64017846c485d4a2810ad_464_464.jpg)
Yeshu Changala Lyrics
- Genre:Gospel
- Year of Release:2023
Lyrics
येशु चांगला, वल्लभ माझा
सनातन त्याची आहे दया
जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी
त्याच्या नावाची स्तुति करू या
हालेलूया, हालेलूया,
हालेलूया, हालेलूया,
सामर्थ्य-धन-ज्ञान
बल-सन्मान, धन्यवादास योग्य तोच
मी यहोवाची, वाट पाहिली
त्यानें माझा धावा ऐकिला
नाशाच्या खाचेतून
वर काढिले दलदलितून
पाय माझे, खडकावर ठेविले
पावले माझी स्थिर केली
मुखात नवे गीत घातीले
माझ्या देवाचे स्तुति स्तवने
माझा प्रभू, माझा यहोवा
तुझ्या शिवाय नाही कोणी मजला
पृथ्वीवरील संतजन
हेच अति प्रिय तुला