Jevha Mi Anandi Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
जेंव्हा मी आनंदी, आराधना करीन
जेंव्हा मी कष्टी, प्रार्थना करीन
येवो किती संकट, कितीही त्रास
देव वचनीच माझा ध्यास
इयोबाच्या जीवनात कष्ट आले
तरी देवाविरुद्ध, न पाप केले
देवाने दिले, देवाने नेले
धन्य त्याचे नाव, असे वदले
इयोबाने शिकले की देवच महान
मित्रांसाठी प्रार्थना करून दिले प्रमाण
देवाने नेले ते देवाने दिले
दुप्पट आशीर्वादाने त्यास धन्य केले
माझ्या पापांचे होते कष्ट महान
क्रुस साहून येशूने केले बलिदान
माझाच प्रभु जो खरा दयावान
विश्वास करून स्वर्गी राहीन हेच निदान