Azavari Mazla Lyrics
- Genre:Gospel
- Year of Release:2023
Lyrics
आजवरी मजला चालविले प्रभूने
येथून पुढेही चालविल कृपेने
हे गुरुराजा पुरवी तू गरजा
उणे नाही मला काही पडणार
शत्रूंच्या पुढे तू मेज वाढीतोस
तेलाचा अभ्यंग मला करितोस
आप्त मित्र जरी माझी निंदा करी
कृपा तुझी मला सर्वदा सावरी
कृपेनेच मला तूझ्या सावलीत
आश्रय तू देतोस सर्व अरिष्टात
करूणा तुझी मला राखे क्षणोक्षणी
क्षणभरही मला सोडीत नाही-२
अंधारात प्रकाश उन्हात सावली
तुझी समक्षता आहे सदा जवळी
टेकाया उराशी जागाच नाही
कोठेही सापडी ह्या भूवरी -२
टेके ल उराशी तुझ्याच मी ख्रिस्ता
तूझ्या मुखप्रकाशात आनंदित सर्वदा