Chalavitho Prabhu Lyrics
- Genre:Gospel
- Year of Release:2023
Lyrics
चालवितो प्रभू मला चालवितो
प्रतिदिनी कृपेत तो मला चालवितो
जगिक काळ संपेतोवरी
राखील तो मला मातेपरी
चिंता नाही काही भीती नाही
सर्व गरज तो पूर्ण करी
वाहतो जो माझा सर्वच भार
वल्लभ माझा मला प्रिय फार
व्याकुळ होतो जेव्हा मी मनी
सांत्वन देतो तो त्याच क्षणी
अंधार आले-जरी वाटेवरी
प्रियजन सोडून गेले तरी
तोच आहे माझा प्रिय सखा
सोबत राहील सदा सर्वदा
संकट त्रास आले जरी
दुःखाने त्रस्त झालो तरी
आनंद आहे मला परमानंद
अनंत जीवनात पूर्णानंद