
Jai Aso ft. Geetanjali More Lyrics
- Genre:Hip Hop & Rap
- Year of Release:2022
Lyrics
जय असो sss , जय असो x 2
स्वप्नातल्या दाही दिशा
आव्हान देतात बेधुंदशा
आभाळ होणाऱ्या पंखांचा
जय असो
येवो पुढे, काही कुठे
शोधू नवी वाट जाऊ तिथे
वेड्या मनांच्या उमेदीचा
जय असो
जय असो , जय असो x 2
जय असो ssss
अंतरा १
काट्यातली वाट , अंधारही दाट
पाऊल रेटून गेलो पुढे
होती अशी जिद्द , होती अशी झेप
आव्हान झेलून गेलो पुढे
काट्यातली वाट , अंधारही दाट
पाऊल रेटून गेलो पुढे
होती अशी जिद्द , होती अशी झेप
आव्हान झेलून गेलो पुढे
भांबावलो, होतो जरी
श्वासात विश्वास होता तरी
आधार देणाऱ्या स्वप्नांचा
जय असो
स्वप्नातल्या दाही दिशा
आव्हान देतात बेधुंदशा
आभाळ होणाऱ्या पंखांचा
जय असो
अंतरा २
जय असो
जगण्याचे रस्ते शोधायाच्या उर्मीचा
जय असो
हातांना हाती घेण्याचा बळ देण्याचा
येवो किती , तूफान ही
घेऊ समाचार आम्ही आव्हानाचा
जय असो
आशेचा आणि आशादायी स्वप्नांचा
जय असो
उदयाचा आणि चमचमणाऱ्या सूर्याचा
स्वप्ने नवी, पाहू चला
रंगात न्हाऊ उद्याच्या s s s
जय असो sss , जय असो