Falling In Love ft. Geetanjali More Lyrics
- Genre:Hip Hop & Rap
- Year of Release:2022
Lyrics
या खुळ्या डोळ्यांमधे
गवसले हरवले सिटीचे रंग वेगळे
रंग वेगळे..
अन् तुझ्या मिठीमधे
उमगले, बहरले प्रितीचे ऊन कोवळे
ऊन कोवळे…
भिजले, रूजले, सजले तुझ्याचसाठी
सरता, सरता पाऊस मी
हिरव्या, हिरव्या पानांत उरले थेंब थेंब मी
उरे, उरे, उरे, उरे हवेत आज
असा कसा, असा कसा तुझाच श्वास
झाले
धुंद धुंद सारे
दूर दूर का ऽऽऽऽ
Longing for your love
ऊन तुच वारे
तुच रंग सारे
Hold me in your arms
‘m falling in love
In NewYork City!!
या फूला फुलावरी
उमटले, विखूरले, मनांतील रंग आगळे
रंग आगळे
फसले, भूलले, खुलले कळी कळी ने
येता वार्याची चाहूल मी
रूसले, झुरले, क्षणात भिजले चिंब चिंब मी
उरे, उरे, उरे, उरे हवेत आज
असा कसा, असा कसा तुझाच श्वास
झाले
धुंद धुंद सारे
दूर दूर का ऽऽऽऽ
Longing for your love
ऊन तुच वारे
तुच रंग सारे
Hold me in your arms
‘m falling in love
बेभान आता
वादळात या…..
तुझा नी माझा
आसमंत हा…..
उरे, उरे, उरे…