गाडा Lyrics
- Genre:Hip Hop & Rap
- Year of Release:2022
Lyrics
ही जिंदगी एक गाडा
गाड्यावरती घर
रस्ता भेटेना सरळ
आला चढ ढकल वर
आला उतार खेचून धर
पण मनगटात बळ
नाही चढ-उताराचा डर
हे चार चाकी वहान चाले
समाज, पैसा, प्रेम स्वप्नांवर
समाज गेला उडत
माझं घर फक्त तीन चाकावर
पेनी मधली आग
उतरली कागदावर
मित्र म्हणतात मला
भाऊ तू लिहतोस जहर
पण भाऊ नाही सगळ्यांचा
मी चहाचा लव्हर
जिंदगीचे सगळे प्रश्न
चहाच्या बाकावर
पैसा फक्त गरजेपुरता
नको नथनी जड नाकावर
हातामध्ये माइक
पाय कँपणीच्या चार लाखावर
खाल्ला नियतीचा मार हं
खाल्ला नियतीचा मार
नाही खाल्ली लाथ पोटावर
मी शिकून आलो जिंदगी
गावाकडच्या ओट्यावर
ह्या सभेतील लोकांच्या
एक केस नाही डोक्यावर
पावसाळे पाह्यले एवढे
मोजणं अवघड बोटावर
गावाकडून पाठवलं
बाळा शिकून मोठा हो
करू नको काम
बिन लायकीच्या लोकाकड
मग कामाचा विचार
माझ्या डोक्यात नाही डोकावत
पेन कागद दप्तरात
मी माझ्या शोधावर
पेनीत नाही शाई
हाय रघत तिच्या टोकावर