आवकाळी पाऊस Lyrics
- Genre:Hip Hop & Rap
- Year of Release:2023
Lyrics
2022 होता गाण्यांचा दुष्काळ
केली वहीची मशागत, न चुकता
पेन म्हणजे नांगर अन बोटं बैलजोडी
पडला शाईचा पाऊस, पीक आलं जमीन फोडीत
Lyrics चा विषय जसा धुऱ्याचा विषय
गेला त गेला जीव बघणार नाय मागं-पुढी
पेनीची चाल नागमोडी, चालते अशी छाप सोडीत
दिलावर पडला ठसा मिटणार नाय 7 पिढी
नशिबाचा खेळ, जिंदगी सापसीडी
प्रत्येक पावला माग चेंदली एका सापाची फडी
अन हा साप म्हणजे परिस्थिती
दिलाच्या कोंट्यात घर करून बसली होती भीती
पण एका भीतीपोटी एका जीवानं मरावं किती
घरच्यांना पुरावं, स्वतःला उरावं किती
हाच हिसाब करण्यात, सहा वर्षे केली खर्च
एक पाय चौकटीत एक बाहीर
पोरगं जेवढं दारचं तेवढं घरचं
जेवढं स्वप्नांसाठी जगणं, तेव्हढंच घरच्यांसाठी मरण
अन घरच्यांसाठी जगतांना, इच्छांना मारणं
पण दिवस दूर नाय
पोरगं करणार घरदार एक
दोन्ही पाय एकाच जागी, स्वप्न घर सारखेच
पोराला दोन्ही तेव्हढेच लाडके
पण होतो गैरसमज
जिभिवर उत्तर नाय, पण दिलामधी हाय धमक
कलाकारी जीवन
ध्येय निश्चित मला नकाशाची नाय समज
त पुढचं पाऊल कोठ पडणार नाय कळत
पण जिथं पडलं तिथं भूकंप,
जमिनीची नाय कदर
पाऊल भक्कम अन हात लिहितात जहर
पण मार्केटला कळत नाय पेंनी-पेनीमधला फरक
मार्केटला काय पाहिजे ठेवली नाही खबर कारण
हिऱ्याचा गुणधर्मच हाय चमक
चमकण्यासाठी त्याला स्वाभिमान विकायची नाय गरज
हिऱ्याचा गुणधर्मच हाय चमक
चमकण्यासाठी मला स्वाभिमान विकायची नाय गरज
2022 होता गाण्यांचा दुष्काळ
केली वहीची मशागत, न चुकता
2023 आवकाळी पाऊस
होत-नव्हत, उरल-सूरल
सगळच
नेणार
वाहून