Devachiye Dwari Lyrics
- Genre:Folk
- Year of Release:2021
Lyrics
क्षणभरी क्षणभरी क्षणभरी क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा
क्षणभरी
देवाचिये द्वारीं उभा, क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधिलिया
हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा
पुण्याची गणना कोण करीं, कोण करीं
देवाचिये द्वारीं
असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे
द्वारकेचे राणे पांडवां घरीं
देवाचिये द्वारीं