Bhetichi Oadh Lyrics
- Genre:Folk
- Year of Release:2024
Lyrics
भेटिची ओढ तुझ्या दर्शनाची आस रे...
तुझ्या मिळणाची देवा मनाची या कास रे...
विठ्ठल विठ्ठल -4
तुझ्या मिळणाची देवा मनाची या कास रे...
तारीलेस जन्माने या
जगायचे बळ दे.....
भक्तिची शिदोरी म्हणुनी
आर्त तूच हाक दे
तुझी भक्ती रूपे शक्ती ठायी ठायी नांदती
माता मनी नाम तूझे जन्नताच गोंदते
रंग लाल लेवूनी अंतरी शब्दी तूच नाच रे
सार्थ होई जन्म मिळाला सखा तूच खास रे
विनवितो जन्म नव्याने
जन्मो जन्मी भान दे
समाधीस्त व्हावे मन हे
ऐसे मज ध्यान दे
ध्येय आता एकची उरले ओठी तुझे नाम हे
देह नाही उरला आता माउलीचे प्राण हे...
निरंतर नाम तुझ्या गोडव्याची ही गुंज रे
भान हरपूनी व्हावे तुझ्यात धुंद रे
भेटिची ओढ तुझ्या दर्शनाची आस रे...
तुझ्या मिळणाची देवा मनाची या कास रे...
विठ्ठल विठ्ठल